उस्मानाबाद/प्रतिनिधी-उस्मानाबाद येथे होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य व मराठवाडा विभाग प्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे काल दि.8डिसेंबर रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रमुख मा.कौतिकराव ठाले—पाटील यांनी निवडीचे पञ प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांना दिले आहे यावेळी महामंडळाचे आतकरे ,दादा गोरे,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे,माधव इंगळे ,प्रा.प्रल्हाद दापके आदी उपस्थित होते.
सदर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद शहरात दि.10 ते 12जानेवारी 2020 या कालावधित संपन्न होणार आहे.हे संमेलन ऐतिहासिक करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पदाधिकारी प्रयत्न करित आहेत या संमेलनाच्या आयोजनात मा.प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांची मदत होणार आहे.त्यांच्या निवडीबद्दल रामकृष्ण परमहंस महाविद्यालय परिसरात व उस्मानाबाद परिसरात कौतुक होत आहे.