तेर/प्रतिनिधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील सोशल अँड एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने  क्रक्रांती ज्योती सावित्रीबाई फुले , राजमाता जिजाऊ , क्रक्रांतीनायीका मुक्ता साळवे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त 4 जानेवारी 2020 रोजी तेर (तह. उस्मानाबाद ) येथे "सावित्रीच्या लेकी" सन्मान सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्व विभाग प्रमुख डॉ माया पाटील , तर बारामती टेक्सटाईल पार्कच्या सुनेत्राताई  पवार , उस्मानाबादच्या जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांची प्रमुख उपस्थीती राहाणार आहे.प्रमुख मार्गदर्शक म्हणून गणराज्य संकल्पक सुषमाताई अंधारे उपस्थीत राहाणार आहे तर प्रमुख पाहूणे म्हणून  पंचायत समिती सदस्य सुरेखा कदम , प्रभावती लामतुरे , जि.प. सदस्य सक्षणा सलगर , अस्मीता कांबळे,शारदाताई वाघ ,प्रा.वाजिता तबसूम मतरन अहमद,सुनंदा भोसले,विद्याताई एकडे,मनिषा  पाटील,मनिषा राखूंडे उपस्थीत राहाणार आहेत.
यावेळी  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा या सोहळ्यात गुणगौरव करण्यात येणार आहे . ग्रामस्थांनी "सावित्रीच्या लेकी "सन्मान सोहळ्याला उपस्थीत रहावे, असे आवाहन  जोशीलाताई  लोमटे यांनी केले आहे. 
 
Top