उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल साडेआठ लाख रूपये किंमतीची गोव्यातील दारू जप्त केली आहे.
कळंब शहरात परराज्यातील बनावटीच्या तसेच अवैध दारू विक्री करणा-याचे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग गोपनीय माहितीनुसार यावर लक्ष ठेवून होता. शहरातील बाबा नगर भागात परराज्यातील दारूचा अवैध साठा असल्याची माहिती मिळाली. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे औरंगाबाद येथ्ील विभागीय उपायुक्त निलेश संागले, जिल्हा अधिक्षक केशव राऊत यांच्या सूचनेप्रमाणे सोमवारी सायंकाळी कळंब-ढोकी रोडवरील बाबा नगर भागातील एका राहत्या घरात उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचा-यांनी अचानक छापा मारला.
या छाप्यात गोवा राज्यातील निर्मिती असलेला मोठा मद्यसाठा जप्त करण्यात आला. हा साठा राज्यांतर्गत विक्री करता येत नाही तसेच बाळगताही येत नाही . त्यामुळे हा अवैध साठा उत्पादन शुल्क विभगाने जप्त केला आहे. त्यांची किंमत जवळपास ८ लाख ३८ हजार रूपये इतकी आहे. या कार्रवाईत उत्पादन शुल्क निरिक्षक एस.एस.गरूड, लातूर येथ्ील राहुल बांगर, जे. एच. चव्हाण, दुय्यम निरिक्षक आर.जी. राठोड, एस.पी.काळे, एल.आर.धनसिंग, शेख, सहाय्यक दुय्यम निरिक्षक प्रकाश माळी, लातूर येथील गणेश गोले यांनी सहभाग नोंदवला. याशिवाय उत्पादन शुल्क विभागाच्या महेश कंकाळ, अविनाश गवळी, विनोद हजारे, अनिल कोळी, विशाल चव्हाण, राजेश गिरी, संतोष कलमुले, बालाजी भंडारी, शेख, एजाज शेख या जवानांनीही कारवाईत सहभाग नोंदविला होता. त्यांना कळंब ठाण्याचे पोनि तानाजी दराडे, महेश शितोळे, राजेश्वरी जावळे यांचे सहकार्य लाभले.
 
Top