उमरगा/प्रतिनिधी-
शहरातील मुस्लीम युवकांच्या वतीने मंहमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताने आज बुधवारी (ता.11) सांयकाळी सहा वाजता  मर्कज मस्जिद येथे धार्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हजरत मौलाना इबादुर्रहमान साब नक्शबंदी यांचे "अजिमुश्शान जलसा -ए- सिरतुनबी इसलाहे मुआशरा " या कार्यक्रमाच्या निमित्ताने धार्मिक, सामाजीक प्रबोधन होणार आहे. हाफीज गुलाम दस्तगीर साब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी  मौलाना गुलाम नबी साहाब (बलसुरी), मौलाना आय्युबसाब (इशाअती), नाजीम मदरसा मेहमुदिया (उमरगा), इमाम मर्कज मस्जीद (उमरगा) यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. कार्यक्रमाला महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. उमरगा शहर व तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन मुस्लीम युवकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top