तेर/प्रतिनिधी-
ढोकी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत तेरच्या राहुल विलास तौर यांने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त ढोकी ता .उस्मानाबाद येथे शनिवार दिनांक 7 रोजी पाचवी ते सातवी , आठवी ते दहावी व खुल्या गटातील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्र संत विद्यालयातील खेळाडू राहुल विलास तौर यांने आठवी ते दहावी वयोगटातील मॅरेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रक्रमांक पटकावला . या यशस्वी खेळाडूंना क्रक्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
 
Top