उस्मानाबाद/प्रतिनिधी -
मुलींच्या सुरक्षेसाठी खासगी क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बाहेर सुरक्षारक्षक नेमावा, क्लासेसला ने-आण करण्यासाठी बस सुरू करावी, वसतिगृहातही मुलींची सुरक्षितता करावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी (दि.13) जिल्हाधिका-यांना देण्यात आले.
खासगी कोचिंग क्लासेसमध्ये एका विषयासाठी विद्याथ्र्यांकडून 20 ते 25 हजार रुपये शुल्क घेतले जातो. मात्र, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सुविधेसह सुरक्षितता दिली जात नाही. त्यामुळे छेडछाडीसह विनयभंगाच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे खासगी क्लासेस, वसतिगृहात मुलींच्या सुरक्षेसाठी मोफत विमा योजना चालू करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आदी मागण्या केल्या. मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, जिल्हा सचिव मिलिंद चांडगे, शहराध्यक्ष संजय पवार, विद्यार्थी सेनेचे सौरभ देशमुख, धीरज खोत, दिलीप राठोड उपस्थित होते.