तुळजापूर/प्रतिनिधी-
नागरिकता दुरुस्ती कायद्या विरोधात व दिल्ली येथे विद्याथ्र्यांवर पोलिसांन कडून झालेल्या अत्याचार विरोधात येथील आपसिंगा रोडवर असणा-या टाटा सामाजिक संस्थेतील शिकत असलेल्या विद्याथ्र्यांनी कँम्पस आवारात दिल्ली पोलिसांच्या विरोधात घोषणा देवुन सरकारचा निषेध केला.
या पुढे ही हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा रस्त्यावर टाटा इन्सुट्युटचे  शैक्षणिक सकुंल असुन येथे देशातील सर्वच राज्यातील विद्यार्थी-विद्यार्थींनी शिक्षण घेत आहेत. यातील शंभर  विद्याथ्र्यांनी  सोमवार दि 16 रोजी टाटा इन्सुट्युट कँम्पस मध्ये सकाळी एकञित येवुन  दिल्ली पोलिसांच्या निषेधाचा तसेच आवाज दो हम एक है 1,2,3,4 दिल्ली पोलिस बंद करो ये अत्याचार अशा घोषणा देवुन परिसर दणाणुन सोडला या पुढे ही हे आंदोलन चालुच ठेवण्याचे संकेत निर्दशनकत्र्या विद्याथ्र्यांनी दिले.

 
Top