तुळजापूर/प्रतिनिधी-
 छञपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरण पाश्र्वभूमीवर नगरपरिषद ने सर्वसाधारण सभा घेवुन त्यात  पुतळा सुशोभिकरण संबंधी ज्या प्रक्रिया कराव्या लागणार आहेत. त्यासाठी लागणा-या विषयांचा मंजुरीचा ठराव  एकमताने पारीत करण्यात आला. या सर्वसाधारण सभेस १६ नगरसेवक उपस्थितीत होते.या सभेत फक्त छञपतीशिवाजीमहाराज पुतळा सुशोभिकरण विषयच मंजूर करण्यात आला .उर्वरीत विषय मुख्याधिकारी कोर्ट तारीख निमित्ताने उपस्थितीत नसल्याने पुढील सर्वसाधारण सभेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपरिषद ने ठराव घेतल्याने पुतळा मुळजागी बसवणे व सुशोभिकरण करणे आता लवकरच मार्गी लागणार आहे.
 सोमवार दि.17 रोजी नगरपरिषदचे नगराध्यक्ष बापुसाहेब कणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत छञपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरण करण्यासंबधी ज्या काही प्रक्रिया कराव्या लागणार आहेत. त्यासंबंधी ठराव मांडण्यात आला. यात छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरणासाठी लागणारी सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा भूसंपादन व नँशनल हायवे कडून रस्ता नगरपरिषद कडे वर्ग करुन घेणे वास्तू विशारद ठरविणे  या प्रक्रिया सुरु करण्यासाठी जो ठराव लागतो तो  मंजूर करण्यात आला. यावेळी लेखापाल काळे  वरिष्ठ लिपीक महादेव सोनार  सह नगरपरिषद कर्मचारी उपस्थितीत होते.

 
Top