कुश्ती सरावासाठी मल्लांना जावे लागते दुस-या तालुक्यात
तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारी शाकंभरी नवराञोत्सवात पुर्वी कुस्ती स्पर्धा घेवुन कुस्तीस प्रोत्साहन दिले जात होते.येथे राज्यातुन नामवंत कुस्तीपटू येवुन हार-जीतची तमा न बाळगता देवीचरणी कुस्तीरुपी सेवा होत आहे  हे मानून या स्पर्धेत भाग घेत होती, माञ गेली अनेक वर्षापासुन  कुस्ती स्पर्धाच  बंद झाल्याने कुस्ती प्रेमी मधुन नाराजी व्यक्त होत आहे. याच नगरीत कुस्ती सरावासाठी बंदीस्त तालीमच नसल्याने  येथील मल्लांना कुश्ती सरावासाठी  दुस-या तालुक्यातील गावी जावे लागत आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात सर्वच तालुक्यात तालीमी आहेत. माञ तुळजापूर तालुक्यात तालीम नाही.तुळजापूर तालुक्यातील अनेक  युवा मल्लांनी कुस्ती मैदाने गाजवले आहेत हे कुस्ती पटू शेतक-यांची मुले आहेत. तालुक्यातील पाच युवा मल्ल महाराष्ट्र केसरीच्या चौथ्या फेरीपर्यत पोहचले आहेत तर शेकडो युवा मल्ल स्थानिक याञेची मैदाने गाजवत आहेत. परंतु या देशी खेळाकडे शासनास, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष करुन विदेशी खेलासाठी लाखो रूपयांची तरतुद केली जाते.
तालुक्यात पुर्वी मोठ्या संखेने गावोगावी तालीमी होत्या. तुळजापूर येथेतर मंदीरालगत व मंगळवार पेठ भागात तालीम होती. त्याची ऐकतर आता  दुरावस्था झाली असुन काहीची प्रचंड पडझड झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो युवा मल्ल आज तालीम नसल्याने सराव करणे शक्य नसल्याने दुस-या गावी जिथे तालीम आहे, तिथे कुस्ती सरावासाठी जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुस्ती खेळाडू मध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

 
Top