उस्मानाबाद /प्रतिनिधी-
येथील अॅड. जयंतराव जगदाळे यांचा पुत्र अर्जुन जगदाळे (21) याचे डेंग्यूच्या आजाराने मुंबईमध्ये उपचारादरम्यान रविवारी (दि.29) सकाळी निधन झाले. अर्जुन पुण्यातील एका महाविद्यालयात आर्किटेक्टरच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो सुट्टीला उस्मानाबादेत आल्यानंतर त्याला डेंग्यूची लागण झाली होती. काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी त्याच्या पार्थिवावर उस्मानाबादेत अंत्यसंस्कार करण्यात आले.या दुखद घटनेनंतर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अॅड. जयंत जगदाळे यांची भेट घेऊन सात्वंन केले.

 
Top