लडाख येथे होणार राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धा 
उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेत उत्कर्ष, प्रज्योत व अभिजित महाराष्ट्र संघात करझू आईस हॉकी रिंक लेह लडाख येथे  स्पर्धा होणार आहे. भारतीय आईस हॉकी महासंघाच्या वतीने लेह लडाख येथील करझू आईस हॉकी रिंक येथे होत असलेल्या राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात प्रज्योत कावरे, उत्कर्ष होनमुटे, अभिजित कंदले यांची निवड झाली आहे.
आईस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या अधिपत्याखाली ठाणे जिल्हा आईस हॉकी असोसिएशनच्या वतीने बोरिवली एस्सेल वल्र्ड येथील आईस हॉकी मैदानावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आईस हॉकी स्पर्धा व राष्ट्रीय स्पर्धा निवडचाचणीतून 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान होत असलेल्या कनिष्ठ वयोगटातील राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेसाठी प्रज्योत कावरे व उत्कर्ष होनमुटे यांची तर 29 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या वरिष्ठ वयोगटातील राष्ट्र्रीय आईस हॉकी स्पर्धेसाठी अभिजित कंदले यांची निवड समितीने महाराष्ट्र संघात निवड केली आहे. स्पर्धेपूर्वी 10 दिवसाचा स्पर्धापूर्व राष्ट्रीय आईस हॉकी प्रशिक्षण शिबीर होणार असून प्रज्योत व उत्कर्ष लडाखकडे रवाना झाले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top