उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मौल्यवान महत्वाचे दस्त बनावट तयार करण्यासाठी लागणा-या साहित्यासह तिघांना कळंब पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दि.7 डिसेेंबर रोजी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास कळंब बसस्थानकासमोर करण्यात आली.
किरण सिध्देश्वर ठेंगल (रा. मुरुड, जि.लातूर), विजय अमर गायकवाड उर्फ धीरज (रा. तुळजापूर) व कबीर धुळा वाघमारे (रा. इर्ला, ता.उस्मानाबाद) यांनी मौल्यवान दस्त बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ खोटे शिक्के, आधार कार्ड, पॅन कार्ड, वेगवेगळया कार्यालयाचे सही-शिक्के असलेले कागदपत्रे, वेगवेगळया बँकेचे कोरे चेक (धनादेश), कोरे दोन आर.सी. बुक, एक लिनिओ कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाइल व टी.व्ही.एस. कंपनीची ज्युपिटर नंबर नसलेली दुचाकी आदी 75 हजाराचे साहित्य जवळ बाळगले असता पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक केली.

 
Top