उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय जागतिक अपंग दिनानिमित्त दि. 02 व 03 डिसेंबर 2019 रोजी श्री. तुळजाभवानी स्टेडियम, उस्मानाबाद येथे जिल्हास्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील श्री शांतेश्र्वर दिव्यांग व्यवसायिक प्रशिक्षण केंद्राने क्रीडा स्पर्धेतील कर्मशाळा विभागातील सर्वसाधारण विजेतेपद आपल्याकडे कायम राखले. तसेच सांस्कृतिक स्पर्धेत बहारदार नृत्य सादरीकरणाने उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत 14 सुवर्ण, 8 रौप्य व 10 कांस्य असे एकूण तब्बल 32 पदकांची कमाई करत क्रक्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तसेच सांस्कृतिक स्पर्धेमध्ये बहारदार नृत्य सादरीकरण करीत द्वितीय क्रमांक मिळविला. यामधील सर्व विजेत्यांना जिल्हा परिषद सदस्य धनराज हिरमुखे, रफीक तांबोळी रोटरी क्लब उमरग्याचे प्रवीणकुमार स्वामी, श्रीमती पाटील , जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, वै. सा. का.  साधना कांबळे सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे यांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.सर्व  विजेत्या स्पर्धकांना प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बालवाड बी. एम, ढेले बी. ए, रेड्डी कपील, काळे महेश, सावंत निशांत, गिर्धवाड भिमराव, मुंडकर माधव, मैंदर्गी किरण, कज्जेवाड सुनिता आदींचे मार्गदर्शन लाभले.
सुवर्ण पदक विजेते 
कु. राठोड अश्र्विनी विलास-100, 200 मीटर धावणे, कु. कोकाटे स्नेहा गोविंद-50, 100 मीटर धावणे, कु. जाधव जयश्री सुरेश-100, 200 मीटर धावणे, कु.केंद्रे गंगासागर- 50 मीटर धावणे, खाडप कृष्णा गणेश-व्हीलचेअरवर बसून गोळा फेक, गाडेकर ज्ञानेश्वर बालाजी-100 मीटर व्हीलचेअर रेस, सुर्यवंशी रूपेश -100 मीटर व्हीलचेअर रेस
रौप्य पदक विजेते 
 कु. कलशेट्टी संगम्मा- 100,200 मीटर धावणे, कु. कदम रागिणी संभाजी - 50 मीटर धावणे, गाडेकर ज्ञानेश्वर बालाजी-व्हीलचे अरवर बसून गोळा फेक, शितोळे निखिल सौदागर-50, 100 मीटर धावणे, निर्मळ एकनाथ सर्जेराव-200 मीटर धावणे, कोतवाल समिर शाहीद -50 मीटर धावणे
कांस्य पदक विजेते 
कु. राठोड राहिली रविंद्र -100 मीटर धावणे , कु. जमादार अश्र्विनी राजेंद्र-100 मीटर धावणे, कु. परांडे अंबिका रवि -50 मीटर  धावणे, कु. केंद्रे गंगासागर- व्हीलचेअरवर बसून गोळा फेक, कु. महावरकर पार्वती  100 मीटर व्हीलचेअर रेस, निर्मळ एकनाथ सर्जेराव 100 मीटर धावणे,  खुरपे संतोष-100 मीटर धावणे, सय्यद खाकीसाब -व्हीलचेअरवर बसून गोळा फेक, मोहिते सागर तानाजी-50 मीटर धावणे, बिराजदार रामेश्वर-100 मीटर व्हीलचेअर रेस, पुजारी शरण सिद्धप्पा, 50 मीटर व्हीलचेअर रेस.
 
Top