कळंब पं.स.च्या सदस्यांच्या पळवापळवीचे प्रकरण
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पंचायत समितीच्या सात सदस्यांना जबरदस्तीने उचलण्यास आलेले तुळजापूर येथील भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आपली गाडी जागेवर सोडून पळ काढावा लागला. माळेवाडी (बोरगाव, ता. माळशिरस) येथे घडलेल्या या राजकीय नाट्यात पाटील यांच्या सोबतच्या चार जणांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आमदार पाटील यांच्यासह 19 जणांवर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पंचायत समितीमधील शिवसेना नेते ओमराजे निंबाळकर गटाचे सात सदस्य माळेवाडी येथील हिंमतराव पाटील यांच्याकडे रविवारी आले होते. रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गाड्यांचा ताफा हिंमतराव पाटील यांच्या घराजवळ आला. चार गाड्यांतून पंधरा ते वीस जण उतरले व हिंमतराव पाटील यांना दमदाटी करू लागले. तसेच, पाटील यांच्यावर पिस्तूल रोखून तुमचे साडू पवनराजे निंबाळकर यांना ज्याप्रमाणे मारले त्याप्रमाणे तुम्हाला मारायला वेळ लागणार नाही, अशी धमकी आमदार पाटील यांनी दिली. ते रवी पाटील कोण आहेत? अशी विचारणा करत माळेवाडीचे माजी सरपंच रवी पाटील यांनाही धमकावण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी आजूबाजूच्या वस्तीवरील लोक जमा होऊ लागल्याने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना आपली गाडी जागेवर सोडून इतर गाडीतून पळ काढावा लागला.
नागरिकांनी उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, आमदार पाटील यांचे स्वीय सहायक गणेश भातलवंडे, दयाशंकर कंकाळ व पोपट चव्हाण या चौघांना पकडून ठेवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर हिंमतराव पाटील यांच्या फिर्यादीवरून आमदार राणाजगजितसिंह पाटील, सतीश दंडनाईक, गणेश भातलवंडे, दयाशंकर कंकाळ, धीरज वीर, मनोगत शिनगारे, अरुण चौधरी, प्रणव चव्हाण, मेघराज देशमुख, दत्तात्रय साळुंखे, पोपट चव्हाण आणि इतर 19 जणांवर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.