उस्मानाबाद/ प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आपले घर बालगृह येथे २१ व २२ नोव्हेंबर रोजी जिल्हा महिला बाल विकास कार्यालय उस्मानाबाद च्या वतीने आयोजित चाचा नेहरू बालमहोत्सवास विद्याथ्र्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी चाचा नेहरू बालमहोत्सवाची सुरूवात दि.२१ नोव्हेंबर रोजी प्रमुख पाहुण्याचे हस्ते चचा नेहरू यांच्या प्रतिमेची पुजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास उद्घाटक उस्मानाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच व्ही वडगावे यांची उपस्थिती होती. तरी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री बी.एच.निपाणीकर, बालकल्याण समिती अध्यक्ष आश्रुबा कदम, ओडसी नृतीका व सेवादलाच्या विश्वस्त श्रीमती झेलम परांजपे, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा, मुख्याध्यापिका संगिता शहा, डॉ. ए.डी.कदम, नंदकुमार कोळगे, डॉ.मोटे, श्रीमती कस्तुराताई कारभार, श्री तानाजी क्षिरसागर यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषण डॉ.वडगावे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून शालेय जीवनातील विद्याथ्र्यांना अनमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर झेलमताई व पन्नालाल सुराणा यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विद्याथ्र्यांसाठी विविध खेळ , गाणी, सांस्कृतिक उपक्रमाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा दोन गटात खेळविल्या गेल्या. त्यामध्ये धावणे, थळी फेक, लांब उडी, गोळा फेक, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्ध, वैयक्तिक नृत्य, गीत, समुह गीत, नृत्य, कॅरम, बुध्दिबळ, चित्रकला आदी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा मध्ये विद्याथ्र्यांनी बाजी मारत, विजय संपादीत केला. यावेळी आयोजकांच्या वतीने स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंसाठी चहा, पाणी, नाष्टा, भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आभार परिविक्षा अधिकारी इरकल सर यांनी मानले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी आपले घर येथील कर्म-यांनी परिश्रम घेतले.