उस्मानाबाद /प्रतिनिधी-
सर्व पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आदींनी अडीच वर्षाच्या कार्यकालात केलेल्या कामाचे कौतुक समाधान देणारे आहे. सर्व सहकारी सदस्य व अधिक-यांच्या सहकार्यातूनच प्रलंबित वसतिशाळा शिक्षकांचा प्रश्न सोडविला, सेसची रक्कम विद्याथ्र्यांच्या गणवेशासाठी वापरली, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याने जिल्हा परिषदेत होणारी शिक्षकांची गर्दी कमी झाली, गुणवत्ता वाढली, शाळांचे थकीत वीजबील भरले, जननी सखी योजना यशस्वीपणे राबवली व ती महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरल्याचे सांगत तुमच्या सर्वांच्या साक्षीने आम्हीच पुन्हा येणार असा विश्वास जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष नेताजी पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांच्या अध्यक्षतेखालील शेवटची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.25) यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. जिल्हा परिषदेची ही सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व सभापतींची निरोपाचीच सभा ठरली. यावेळी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांसह सदस्यांनी मागील अडीच ते तीन वर्षाच्या कार्यकालात अध्यक्ष नेताजी पाटील यांनी मोठ्या कौशल्याने सर्वांना सोबत घेऊन कामकाज पार पाडल्याचे कौतुकाने सांगितले. तसेच या कार्यकालात जिल्हा परिषदेने घेतलेल्या अनेक ऐतिहासिक निर्णयामध्ये विरोधकांनाही याबाबत विश्वासात घेऊन त्याची अंमलबजावणी केली असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर गिते यांनी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकालातील कामकाजाचे कौतुक करत पदाधिकारी व अधिकारी या दोघांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर अनेकांनी या विषयावर बोलताना अध्यक्षांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून ते विरोधकांनाही आपलस करून घेत जिव्हाळ्याचे विषय मार्गी लावत होते, असे सांगत पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.