उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 शहरातील तेरणा कॉलेज टी जंक्शन येथे चुकीच्या दिशेने आलेल्या पिकअप चालकाने कारला धडक दिल्याने यामध्ये कारमधील दोघे जखमी झाले. हा अपघात दि.28 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.40 वाजता घडला. यामध्ये कारमधील भागवत लिंबराज घेवारे (रा. सांजा रोड) व सूर्यकांत नाईक हे दोघे जखमी झाले.
यामध्ये घेवारे यांच्या कारचे (एमएच 25 एएल 4778) नुकसान झाले असून याप्रकरणी पिकअप क्रक्र. एमएच 13 सीयू 0625 च्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top