उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हयातील जिला परिषद, नगर परिषदेच्या शाळेची सर्वत्र दयनिय अवस्था आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांसह पालकांचाही कल खाजगी शाळेकडे जास्त असल्याचे दिसून येते. माद्ध आता पालिकेच्या शळाही कात टाकत असून उस्मानाबाद शहरातील दोन पालिकेच्या शाळेत ४० संगणक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शाळेतील ४५१ विद्याथ्र्यांना संगणकाचे धडे मिळत आहेत.
पुस्तकी शिक्षणाबरोबरच नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी ही मोठया उस्तुकतेने संगणकीय शिक्षण घेत आहेत. संगणक कक्ष सुरू झाल्यावर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी भेट देऊन विद्याथ्र्यांशी संवाद साधला.

 
Top