उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कर्तव्यावरील महिला कॉन्स्टेबलला धमकावून, शिवीगाळ करणा-या तिघांविरोधात परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.28) सायंकाळी सातच्या सुमारास सोनारी टी जंक्शनजवळ घडली होती.
महिला पोलिस कॉन्स्टेबल वैशाली राजपूत इतर पोलिस सहका-यांसह दि.28 रोजी सोनारी टी जंक्शन येथे नाकाबंदी कर्तव्य करत होत्या. यावेळी त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या वॅगनर कारला अडवून चालकास सीटबेल्ट न लावल्याने मोटार वाहन कायदा-नियमांचा भंग झाल्याची जाणीव करून दिली. यावर कारमधील महादेव हजारे, बळीराम हजारे व वैजिनाथ हजारे (सर्व रा. कौडगांव, ता. परंडा) यांनी ड्डद्यह्ल147 तुम्ही कोणाची गाडी अडवली आहे, मी तुमची नोकरी घालवतो', असे धमकावून पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कर्तव्यात अडथळा केला. याप्रकरणी राजपूत यांच्या फिर्यादीवरून परंडा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top