उस्मानाबाद/प्रतिनिधी-वाशी तालुक्यातील खामकरवाडी गावात ११५ शोष खड्डे, तयार करून, साडपाणी व घरावरचे पाणी त्यात जीरवण्याचे काम केले. त्यामुळे गावातील २४ बोअर पैकी २० बोअर सुरू झाले. लोकांनी आता शेती सुधारण्यासाठी शासकीय योजनेतून बोअर व विहीरीचे पुर्नभरून करून घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी केले.
खामकरवाडी गावात आय वॉच फांउडेशन मुंबई यांच्या वतीने १० हजार फळरोपे वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. वृक्षरोपनासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे गांव पाणीदार बनविण्यासाठी पुर्नभरण हे महत्वाचे आहे. तरच या भगातील पाण्याचा प्रश्न सुटेल या कार्यक्रमास बालाजी पवार, आतुल लुघडे, तालुका कृषी अधिकारी भोसले, कृषी अधिकारी राठोड, विस्तार अधिकारी संभाजी सावंत, अतुल वाघमारे, सुधीर माने, शिवाजी जावळे, अमोल माने आदी उपस्थित होते. शेवटी आभार बालाजी पवार यांनी मानले.