|
तेर/प्रतिनिधी -उस्मानाबाद तालुक्यातील तेरसह कोळेवाडी, वाणेवाडी परिसरातील अळीने बाधित सोयाबीन क्षेत्राची भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी पाहणी केली.
या परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोमवारी (दि.९) राणाजगजितसिंह पाटील यांनी या परिसरातील सोयाबीनच्या पिकाची पाहणी केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, पद्माकर फंड, सरपंच नवनाथ नाईकवाडी, जुनेद मोमीन, भास्कर माळी, सुरजीत राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांनी अळ्यांमुळे पीक नुकसानीची कैफियत मांडली. पाटील यांनी तत्काळ कृषी अधिकाऱ्यांना पाहणी करण्याच्या सूचना केल्या. जिपचे जिल्हा कृषी अधिकारी टी. जे. चिमणशेट्ये, तालुका कृषी अधिकारी ए. जी. देशमुख, कृषी सहाय्यक कुमूद मगर हे दाखल झाले. परंतु, पाऊस आल्याने शेतात जाता आले नाही. मात्र, त्यांनी फवारणी व औषधींची माहिती दिली. मंगळवारी कृषी विभागाचे कर्मचारी पाहणी करणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. | ||
