उस्मानाबाद (प्रतिनिधी) -
टाकळी (बें)येथील व सध्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत आसणारे प्रा. राजा जगताप लिखित गाव तेथे बुद्ध— विहार या कादंबरीचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, भन्तेजी सुमेध नागसेन यांच्या हस्ते व राम गायकवाड साहित्यिक जालना,साहित्यिक माधव जाधव कंधार—नांदेड,प्रा.डाॅ.शिवाजीरा व देशमुख तुळजापूर,थिंक टँक चे प्रकाशक बाळासाहेब मागाडे,प्रा.शिवराज गोपाळे रत्नागिरी,प्रा.डाॅ.रत्नाकर मस्के,लेखक प्रा.राजा जगताप या मान्यवरांच्या उपस्थितीत
टाकळी (बें)येथील व सध्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत आसणारे प्रा. राजा जगताप लिखित गाव तेथे बुद्ध— विहार या कादंबरीचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, भन्तेजी सुमेध नागसेन यांच्या हस्ते व राम गायकवाड साहित्यिक जालना,साहित्यिक माधव जाधव कंधार—नांदेड,प्रा.डाॅ.शिवाजीरा
शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात या कादंबरीचा प्रकाशन सोहळा आजपार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. जयसिंगराव देशमुख उपस्थिती होते.प्रास्ताविक करतांना डाॅ.शिवाजीराव देशमुख म्हणाले की,दलित साहित्याऐवजी आता आंबेडकरी साहित्य प्रवाह रूढ झाला आसतानाच आज बोध्द साहित्याची मांडणी केली जात आहे आशावेळी राजा जगताप यांची गाव तेथे बुध्द विहार कादंबरीने नवा संदेश दिला आहे.
प्रा.डाॅ.रत्नाकर मस्के म्हणाले की,गाव तेथे बुध्द विहार कादंबरी आंबेडकरी तरूनांना आत्मभान आणून देते.व बाबासाहेबांना अभिप्रेत आसणारा तरूण प्रकाशच्या माध्यमातून गावात भंतेजी सुमेध यांचे मदतिने विहार कसे बांधतो याचे चिञण मांडले आहे.साहित्यिक राम गायकवाड म्हणाले की,राजा जगताप यांची कादंबरी नविन वाट घेऊन जन्मली आहे स्वातंञ्य,समता,बंधुता,न्याय या संविधानिक मूल्यांची जोपासना करायला सांगते त्यांच्या कादंबरीतील नायकाचा प्रवास खडतर आसला तरी प्रेरणा देणारा आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे म्हणाले की,आंबेडकरी साहित्यामध्ये भंतेजी व विहाराचे महत्व सांगाणारी कादंबरी नव्हती ती उणीव या कादंबरीने भरून काढली आहे व ही कादंबरी अंधश्रध्दा नाकारते व नविन पण छोटे उद्योग करायला सांगते.आंबेडकरी तरूणांना नव्या मूल्यांची शिकवण देते,भंतेजी सुमेध म्हणाले की,मी खरोसा लेणी परिसरात बुध्द विहार उभे करत आहे.त्यासाठी धम्म परिषदा व अनेक उपक्रम घेऊन बुध्द धम्माचा प्रचार व प्रसार करत आहे,आज खरोसा लेणी परिसरात धम्म बांधव येत आहेत मी जे काम करतो त्यावर प्रा.जगताप सरांनी कादंबरीचा विषय केल्याने आज मला कामाची पोहच मिळाली आहे.
प्रा.राजा जगताप यांनी लेखकाचे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,आर.पी.काॅलेजमध्येच शिकतांना लिहायचे बळ येथेच मिळाले व कादंबरी प्रकाशन करतांना आज आनंद मिळतोय.
अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की डाॅ .बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान लिहिले त्यामुळेच शेवटचा घटक प्रवाहात येतो आहे.आजही आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही.राजा जगताप या काॅलेजच्या मातीतून आला आहे त्याच्या कथा,लेख वाचनीय आसतात ही कादंबरी समाजाला संस्कार सांगणारी आहे.
यावेळी बाळासाहेब मागाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यात भंतेजी सुमेध यांनी प्रा.राजा जगताप यांना साडे तीन फुटाची बुध्द मुर्ती भेट देऊन सत्कार केला मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतिने नितीन तावडे,राजेंद्र अञे,माधव इंगळे यांचेबरोबरच पृथ्वीराज चिलवंत, धम्मादाय फाऊंडेशनचे विजय बनसोडे,कवी पंडित कांबळे,कथाकार जयराज खुने,युवराज भिसे,बहुजन विद्यार्थी संघटना हुकमत मुलाणी,भाऊसाहेब अणदूरकर यांनी राजा जगताप यांचा सत्कार केला.यावेळी उस्मानाबाद शहरातील साहित्य प्रेमींनी खुपच गर्दी केली होती.सूञसंचलन प्रा.अरविंद हंगरगेकर यांनी केले आभार लेखक प्रा.राजा जगताप यांनी मानले