उस्मानाबाद/प्रतिनिधी-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा तायक्वाँदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते सोमवारी (दि.९) उद्घाटन झाले. या स्पर्धेत उस्मानाबादसह लातूर, नांदेड जिल्ह्यातील २३२ खेळाडूंचा सहभाग आहे. 
उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेत विविध वजनी गटात २३२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये मुलांमध्ये १३१ तर मुलींमध्ये १०१ खेळाडू सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय रणदिवे तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, असोसिएशनचे सचिव राजेश महाजन, बालाजी जोगदंड, चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ घोणसे, अनिल बळवंत आदींची उपस्थिती होती. स्पर्धेत राम दराडे, एकनाथ सुतार, अमित गायकवाड, रवी जाधव, सूर्यकांत वाघमारे, आकाश मोरे, निकिता टोकळे, स्मिता गायकवाड, श्रद्धा कंकाळ, राष्ट्रपाल नरवडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताजी जाधव यांनी केले. 

 
Top