उस्मानाबाद /प्रतिनिधी-भारत हा महासत्ता व्हावा यासाठी डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांनी स्वप्न पाहिल होते ते स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे.मात्र त्यात मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढला पाहिजे असे प्रतिपादन भाजपा नेते तथा धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी ढोकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत फ्रेंडस ग्रूप व दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार,पालक सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतिश देशमुख,पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख,ढोकीचे उपसरपंच अमोल समुद्रे,जि.प.चे माजी सभापती दगडू धावारे,प्राचार्य डॉ. हरिदास फेरे,आरेफ काझी,शाकीर शेख,प्राचार्य भोरे,पांडूरंग वाकूरे यांच्यासह अनेक मान्यवर  उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की,भारत देश महासत्ता होणारच आहे पण त्यात आपण कुठे असणार हे स्थान विद्यार्थ्यांनी निश्चित आताच करावे तसेच पूढील दहा वर्षात कोणत्या शिक्षणाने रोजगार उपलब्ध होणार आहे याचे मार्गदर्शन घेऊन शिक्षणाची शाखा निवडावी असे आवाहान त्यांनी केले.यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतिश देशमुख, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख,
डॉ.हरिदास फेरे,पांडूरंग वाकूरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोप करताना फ्रेडंस ग्रूप व दूर्गवीर प्रतिष्ठानचे गुणवंताचा सत्कार व शालेय साहित्य वाटपाबद्दल आभार मानले.यावेळी ढोकी गावातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे आभार बंटी वाकूरे तर सुत्रसंचलन ऋषीकेश पवार यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओमप्रसाद धाकपाडे, गुलचंद लंगडे,केदारनाथ धाकपाडे, बबलु सिरसट,अमोल थोडसरे,ज्ञानेश्वर थोडसरे यांच्यासह फ्रेंडस ग्रूप व दुर्गावीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
 
Top