उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात उस्मानाबाद येथे होऊ घातलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. त्याकरिता अकरा सदस्यांची अस्थायी समिती गठीत करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. अस्थायी समितीच्या माध्यमातून स्वागत मंडळाच्या सभासद नोंदणीसाठी प्रारंभ करण्याचा ठरावही यावेळी सर्वानुमते करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा उस्मानाबाद येथे पार पडणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेने जिल्ह्यातील विविध संस्था आणि संघटनांच्या सहकार्यातून संमेलन आयोजनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. संमेलन जाहीर झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी या निर्णयाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले होते. संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी विविध ठिकाणी भेटी आणि बैठकीचे आयोजन केले जात आहे. स्वागत मंडळाची निवड आणि इतर अनुषंगिक कामासाठी साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्या कार्यकारणीला अस्थायी समिती करण्याबाबत महामंडळाच्या वतीने निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तांगण बालवाडी येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत अकरा सदस्यांची अस्थायी समिती गठीत करण्यात आली आहे.
साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाची निवड होण्यापूर्वी संमेलनाच्या अनुषंगाने आवश्यक असलेली पूर्वतयारी समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या अस्थायी समितीमध्ये नितीन तावडे, माधव इंगळे, कमलताई नलावडे, राजेंद्र अत्रे, संदीपान कुंभार, रवींद्र केसकर, बालाजी तांबे, डॉ. प्रशांत चौधरी, युवराज नळे, पंडित कांबळे, हनुमंत पडवळ यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाड्याला 16 वर्षानंतर साहित्य संमेलन आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा सन्मान विविध पातळीवर कार्यरत असणार्या सर्व संस्था, संघटना, शासन, प्रशासन आणि सामान्य उस्मानाबादकरांच्या माध्यमातून नक्की ऐतिहासिक ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आणि स्वागत मंडळाच्या सभासद नोंदणीसाठी नितीन तवाडे यांनी ठराव मांडला. सर्वानुमते या ठरावाला संमती देऊन स्वागत मंडळ सभासद नोंदणीसाठी सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वागत मंडळाच्या नियुक्तीनंतर या अस्थायी समितीचे विसर्जन केले जाणार आहे.
पहिली देणगी माजी समेलनाध्यक्षांकडून
साहित्य संमेलनाच्या निधी संकलनाची सुरुवात माजी समेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यापासून सुरू झाली आहे. मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या देशमुख यांनी उस्मानाबाद येथे होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाकरिता 21 हजार रुपयांची देणगी जाहीर केली आहे. बडोदा येथे झालेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे देशमुख अध्यक्ष होते.