प्रतिनिधी/उस्मानाबाद -
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ने चांगली मते मिळविल्याने पार्टीमधील नेते, कार्यकर्तांचा आत्मविश्वास दुनावला आहे. येणारी विधानसभा निवडणुक पुर्ण ताकदीने लढविली जाणार असून दुस-या पक्षातील आजी-माजी आमदार-खासदार तसेच माजी मंत्री वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्याची नावे येत्या कांही दिवसातच स्पष्ट होतील, असी माहिती वंचित बहुजन आघाडी के केंद्रीय कार्यकारणी सदस्य अॅड. आण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात रविवार दि. २१ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हयातील चार विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनवणे, रेखाताई ठाकुर, अर्जुन सलगर, राम गारकर, अशोक सानवणे उस्मानाबादेत आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत घेवून वंचित बहुजन आघाडी ची भूमिका स्पष्ट करण्यात आली. पुढे बोलताना अॅड. आण्णाराव पाटील म्हणाले की, लोकसभेच्या ४८ जागा लढविल्या, उमेदवारांना एबी फार्म दिल्यानंतर सर्व उमेदवारांनी निवडणुक पुर्ण ताकदीने लढवली एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही किंवा मॅनेज झाला नाही. विधानसभेच्या २८८ जागा लढविल्या जाणार असून मुलाखतीचे घेण्याचे काम सुरू झाले आहे. गेल्या आठवडयात नागपूर, अमरावती, आकोला विभागातील ६५० उम्मेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती घेण्यात आलेल्या उमेदवारामध्ये उच्चशिक्षीत, तंज्ञ, विद्वान उमेदवारांचा समावेश आहे. तसेच अनेक आजी-माजी आमदार, खासदार, माजी  मंत्री आघाडीच्या संपर्कात आहेत. वंचित बहुजन आघाडीकडे दलित, मुस्लिम मतदार असल्याने आमची सत्ता येणार आहे. विधानसभा निवडणुकीत सक्षम, प्रामाणिक उमेदवारांना संधी दिली जाणार असून यावेळेस आम्ही सरकार बनविणार आहोत आणि बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री बनविणार आहोत, असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी मिलिंद रोकडे, विकास बनसोडे, प्रा.सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.
 
Top