तुळजापूर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत नॉट रिचेबल मधून रिचेबल मध्ये येण्यासाठी उम्मीदवार बदलला गेला, त्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ शकते, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.
तुळजापूर शहरातील श्रीनाथ लॉन्स मंगल कार्यालयात कार्यकत्र्यांचा मेळावा शनिवारी सांयकाळी उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवसेनेचे  खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,  संजय निंबाळकर, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे,महिला आघाडीच्या शामल वडणे, उपनगराध्यक्ष सुरज साळुंखे, सुरजभाऊ कांबळे, जि.प.माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, गणेश सोनटक्के, दत्ता साळुंके, संजय भोसले, रामभाऊ पडवळ, प्रविण कोकाटे, जगन्नाथ गवळी, सतिश सोमाणी, सुधीर कदम, संतोष पुदाले, प्रतिक रोचकरी, रोहित चव्हाण, प्रदिप मगर, बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी यांच प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ना.सावंत व खा.ओमराजे यांचा तुळजाभवानी देवीची प्रतिमा भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला. ना.सावंत यांनी तुळजापूर विधानसभा जागेबाबत आमचे एक ठरलं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नाराळ फुटला असे समजून कामाला लागा असे आव्हान यावेळी ना. सावंत यांनी केले. पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरी ने या जिल्हयाचा विकास करेन, असे ही सावंत म्हणाले.त्यामुळे विरोधकांनी आमचा नाद करायचा नाही, असा इशारा भी दिला.

 
Top