कळंब/प्रतिनीधी - रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी व निवडणूक विभाग तहसील कार्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयांमध्ये भव्य मतदार नोंदणी अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मतदान नोंदणी कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातून राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी देखील सक्रियपणे सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. सुनिल पवार हे होते. तर प्रमुख उपस्थितीत ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा, संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर व नायब तहसीलदार अस्लम जमादार प्रामुख्याने उपस्थित होते. आयोजक म्हणून रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष हर्षद अंबुरे, सचिव डॉ. हनुमंत चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन श्री. प्रभू बनाळे हे उपस्थित होते. याप्रसंगी श्री. अस्लम जमादार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदार नोंदणी संदर्भात चर्चा केली व मतदानाचे महत्त्व पटवून दिले, मतदारांची जबाबदारी देखील याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित केले व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी फॉर्म देऊन मतदार नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी श्री अरविंद शिंदे, प्रा. मीनाक्षी जाधव, प्रा. अर्चना मुखेड़कर यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. दत्ता साकोळे, डॉ. दीपक सूर्यवंशी डॉ. ढोले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नामानंद साठे यांनी केले तर आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख व रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. ईश्वर राठोड यांनी मानले. याप्रसंगी मतदार नोंदणी अभियानामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कळंबमध्ये भव्य मतदार नोंदणी अभियानास सुरूवात
कळंब/प्रतिनीधी - रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी व निवडणूक विभाग तहसील कार्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयांमध्ये भव्य मतदार नोंदणी अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मतदान नोंदणी कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातून राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी देखील सक्रियपणे सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. सुनिल पवार हे होते. तर प्रमुख उपस्थितीत ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा, संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर व नायब तहसीलदार अस्लम जमादार प्रामुख्याने उपस्थित होते. आयोजक म्हणून रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष हर्षद अंबुरे, सचिव डॉ. हनुमंत चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन श्री. प्रभू बनाळे हे उपस्थित होते. याप्रसंगी श्री. अस्लम जमादार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदार नोंदणी संदर्भात चर्चा केली व मतदानाचे महत्त्व पटवून दिले, मतदारांची जबाबदारी देखील याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित केले व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी फॉर्म देऊन मतदार नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी श्री अरविंद शिंदे, प्रा. मीनाक्षी जाधव, प्रा. अर्चना मुखेड़कर यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. दत्ता साकोळे, डॉ. दीपक सूर्यवंशी डॉ. ढोले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नामानंद साठे यांनी केले तर आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख व रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. ईश्वर राठोड यांनी मानले. याप्रसंगी मतदार नोंदणी अभियानामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.