सुमारे चाळीस शेतकरी ठिय्या मांडून बसले होते. दुपारी एक वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी ३ वाजेच्या दरम्यान संपले. यावेळी जिल्हाधिका-यांनी उद्या दुपारी कारखाना एमडीची बैठक बोलावली असून या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. विशेष म्हणजे पाच वेळा कारखान्याच्या जमीनीचा लिलाव झाला. मात्र त्या लिलावांमध्ये कोणीही सहभाग घेतला नाही. त्यामुळे जमीन विक्री होऊन शेतक-यांना पैसे देता आलेले नाहीत. शेतकरी सातत्याने ऊस बिलाचे पैसे मिळावेत यासाठी मोर्चा, लाक्षणिक उपोषण असे मार्ग स्वीकारून आंदोलन करत आहेत.
मात्र तरीही शेतक-यांना पैसे मिळाले नाहीत अखेर सोमवारी शेतक-यांनी जिल्हाधिकारी यांच्या केबिन समोर ठिय्या मांडून आंदोलनास प्रारंभ केला होता. जय लक्ष्मी शुगर ने 2014 मध्ये जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील शेतक-यांचा ऊस गाळप केला. मात्र त्यांनाही अद्याप ऊस बिल मिळाले नाही. दुपारचे जेवणही ठिय्या मांडलेल्या ठिकाणीच शेतक-यांनी केले.
त्यामुळे जोपर्यंत उस बिलाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार शेतक-यांनी व्यक्त होता. परंतू जिल्हाधिका-यांनी उद्याच्या बैठकीत प्रश्र सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते संपविण्यात आले.आंदोलनात लगभग ४० पिडीत शेतक-यांनी भाग घेतला होता.
पेमेंन्ट न मिळल्यास सामुहिक आत्महत्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविंद्र इंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना या कारखान्याकडून ७ कोटी रूपये येणे असून उस्मानाबाद-बीड-लातूर या जिल्हयातील शेतक-यांचे पेमेंन्ट बाकी आहे, कारखान्याचे एम.डी प्रशासनाची दिशाभूल करून पेमेंन्ट दिल्याचे सांगत आहेत. बीड जिल्यातील सांगवी येथील शेतकरी महादेव ठोंबरे व तानाजी जत यांनी कारखान्याने दिलेले चेक चार वेळेस वठविण्यासाठी बॅंकेत टाकले होते. परंतू चेक वठले नाहीत. त्यामुळे उद्या पेमेंन्ट न मिळाल्यास आत्महत्याशिवाय पर्यांय नाही, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.