काटी /प्रतिनिधी - आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्या पक्षांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी माजी मंत्री आमदार बसवराज पाटील यांची निवड झाली त्याबद्दल तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार दि. (22) रोजी दुपारी चार वाजता उमरगा येथील आदर्श महाविद्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नुतन कार्याध्यक्ष यांचा तुळजापूर तालुका पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी सभापती शिवाजीराव गायकवाड, सुजित हंगरगेकर, रामकृष्ण खरोसेकर, दिलीप भालेराव, सुरेश कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभापती शिवाजीराव गायकवाड, सुजित हंगरगेकर, रामकृष्ण खरोसेकर, दिलीप भालेराव, सुरेश कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.