उस्मानाबाद/प्रतिनिधी- प्रहार अपंग क्रांती आंदोलन उस्मानाबाद च्या वतीने आज मा.जिल्हाधिकारी साहेबाना निवेदन देण्यात आले या निवेदनात मागील 3-7-2017 रोजीच्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या निवेदनाची देखल घेऊन प्रत्येक वर्ष्यामधील 25 जुलै ही तारीख ही विशेष ग्रामसभा म्हणुन घेण्यात येईल असे आदेश सर्व गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना देण्यात आले या मध्ये जो ग्रामसेवक ही ग्रामसभा घेणार नाही त्याच्यावर अपात्रतेची कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात येईल असे आदेशात नमुद करण्यात आले 
याच अनुषंगाने आज प्रहार संघटनेच्या वतीने मा जिल्हाधिकारी साहेबाना निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे , उस्मानाबाद तालुकाध्यक्ष शिवाजी पोतदार, शशिकांतजी मूळे, रणजित मगर,महंमद पैगंम्बर, साहेबराव ननवरे, तुकाराम झेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते...
Attachments area
 
Top