उस्मानाबाद/प्रतिनिधी-
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या 28 मार्च 2018 रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये उस्मानाबाद येथील ज्येष्ठ विधीज्ञ तथा भाजपाचे ज्येषठ नेते अॅड. मिलिंद शंकरराव पाटील हे विजयी झाले आहेत. गेल्या वर्षी या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. परंतू कांही उमेदवार सर्वोच्च न्यायालयात गेल्याने निकाल घोषित करण्यात आला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवार दि. 22 रोजी निकाल घोषित झाला असून अॅड. मिलिंद पाटील विजयी झाले आहेत.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या 25 सदस्य निवडीसाठी 164 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. जवळपास दिड लाख मतदारापैकी 70 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत अॅड. मिलींद पाटील विजयी झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
विजयी झाल्याबद्दल मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते पुष्पगुचछ देऊन अॅड. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे, डॉ. गोविंद कोकाटे, प्रविण काळे, तानाजी पाटील, रोहित येवतीकर उपस्थित होते.