उस्मानाबाद/प्रतिनिधी-उस्मानाबाद व बीड जिल्हयात वारंवार दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांचे काम लवकर होणे आवश्यक आहे. ऑक्टोबर २०१६ च्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पास दरवर्षी १२०० कोटी रूपये देऊन चार वर्षांत हा प्रकल्प पुर्ण करू, असे सांगितले होते. परंतू प्रत्यक्षात ४०० कोटीची मागणी केल्यानंतर २५० कोटी रूपये दिले जातात. त्यामुळे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाबाबत नेमके काय ? काय चालले. केंद्रीय जल आयोगाकडे भरभक्कम बाजू मांडण्यासाठी या प्रकल्पाची कालमर्यादा ठरविण्यासाठी आढावा बैठक बोलवा, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री तथा आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
रविवार दि. २१ जुलै रोजी राष्ट्रवादी भवन मधे बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत सरकार एकीकडे जाचक अटी लादतात. दुसरीकडे पुरेसा निधी दिला जात नाही. प्राधान्य क्रम ठरविला जातो, त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती येत नाही या प्रकल्पाची किंमत त्यामुळे वाढत आहे. त्यामुळे मिळणारा निधी पुरेसा नाही, ऑक्टोबर २०१६ रोजी औरंगाबाद येथे बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पास दरवर्षी १२०० कोटी रूपये दिले जातील व चार वर्षांत हा प्रकल्प पुर्ण केला जाईल, असे जाहीर केले होते. परंतू प्रत्यक्षात सिंचन विभागाचे अधिकारी मागणी करताना ४०० कोटीची मागणी करतात सरकार त्यांना २५० कोटीच उपलब्ध करून देतात. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामावर परिणाम होत आहे.उस्मानाबाद जिल्हयातील सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यात आढावा घ्यावा. सात टीएमसी चे काम पुर्ण करावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक लावणे आवश्यक आहे, असे आ.पाटील यांनी सांगितले.