भाजपा ची राज्यव्यापी महाजनादेश यात्रा १ ऑगस्ट पासुन सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघणा-या या यात्रेचे प्रमुख म्हणून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या नावाची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथ्ील विशेष कार्यसमितीत केली. या नवीन जबाबदारीमुळे उस्मानाबाद जिल्हयातील भाजप कार्यकत्र्यांनी आ. ठाकूर यांचे अभिनंदन केले. महाजनादेश यात्रेची सुरूवात १ ऑगस्टला तुकडोजी महाराजांच्या भूमीतून म्हणजे अमरावतीत जिल्हयातल्या गुरूकुंज मोझरी येथून होणार आहे. तर समारोप नाशिकध्ये ३१ ऑक्टोबरला होणार आहे.अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाच्या दिवशी या यात्रेच्या प्रारंभ होणार आहे. ही यात्रा २५ दिवस, मुंबई वगळता ३० जिल्हयांमध्ये, ४२३२ किमी प्रवास असणार आहे. यात १५२ मतदार संघांचा समावेश असणार असून ३०० पेक्षा जास्त सभा यात मुख्यमंत्री घेणार आहेत. यात १०४ जाहीर सभा, २२८ स्वागत
सभा आणि २० पत्रकार परिषदा घेतल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यात्रा रथातून प्रवास करणार असून एकही ठिकाणी महापुरूषांच्या पुतळ्याला, मंदिराला भेट दिली जाणार नाही. दुसरा टप्पा नगर येथील अकोले ते नाशिक असा असणार असून एलईडी रथावर चित्रफीतीच्या साहाय्याने विकासकामे दाख्विली जाणार आहेत. या यात्रेदरम्यान प्रदेश कार्यालयाच्या पूर्व परवानगीश्विाय कोणाचेही प्रवेश केले जाणार नाहीत. आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्यावर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी होती. यापुर्वीही आ. ठाकुर यांच्यावर अनेक महत्वाच्या पक्ष संघटनेच्या जाबाबदा-या होत्या. त्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या होत्या .