उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
सामाईक खरेदी केलेल्या जमिनी‘या मंजूर फेरफारप्रमाणे ऑनलाईन सातबारा उता-यावर हिस्सादार यांचे क्षेत्र वेगवेगळे करण्यासाठी चार हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत अधिक महिती अशी की, ऑनलाईन सातबारा उता-यावर हिस्सादार यांचे क्षेत्र वेेगवेगळे करून देण्यासाठी घाटपिंपरी येथील तलाठी सुप्रिया सूर्यकांत ठाकर यांनी तक्रारदार शेतक-यांकडे जवळपास चार हजार रूपयांची लाचेची मांगणी केली. सदरील प्रकरणी शेतक-याने लाचलुचपत विभागकडे तक्रार दाखल केली. तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर मंगळवारी गावातीलच चारा छावणीमध्ये सापळा लावण्यात आला. यावेळी तलाठी ठाकर यांना तक्ररदार शेतक-याकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचे‘या रक्कमेसह ठाकर यांना ताब्यात घेण्यात आले.