टिबी मुक्त भारत अभियानात आपलाही सहभाग राहावा या हेतूने याच्या जनजागृती साठी ओडीसा राज्यातील रोटरी क्लबचा 27 वर्षीय तरूण सदस्य त्रिलोचन महालिक हा सध्या भारतभर सायकल वरून प्रवास करत शहर, गाव, शाळा, महाविद्यालयात क्षयरोगा बाबत मार्गदर्शन करीत आहे.
टिबी हारेगा, देश जितेगा हा नारा घेवून जागतिक क्षयरोग दिना निमित्त क्षयरोगा (टिबी) बाबत जनजागृती करण्यासाठी 24 मार्च 2019 रोजी ओडीसा राज्यातील रोटरी सदस्य त्रिलोचन महालिक रा. कालीमेघा जि. भद्रक येथून भारतभर सायकल वरून प्रवास करत शहर, गाव, शाळा, महाविद्यालयात क्षयरोगा बाबत मार्गदर्शन करीत आहे. ओडीसा, बरामपूर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका तून महाराष्ट्राच्या उमरगा (जि.उस्मानाबाद) शहरात दिड हजार किलोमीटर इतका सायकल प्रवास करून उमरगा शहरात आगमन झाले. रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोपळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ विनोद देवरकर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी रोटरीचे माजी माजी अध्यक्ष प्रा. डॉ. संजय अस्वले, प्रा. डॉ. रवी आळंगे, शमीम पठाण, माजी सचिव मनिष सोनी, संजय ढोणे, विरभद्र स्वामी, नागराज दंडगे, बाळू बिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
