तेर/ प्रतिनीधी- तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात युथ फाऊंडेशन तर्फे अॅथेलॅटीक्स स्पर्धेत सांगली येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून विद्यालयास क्रीडा साहीत्य देण्यात आले..
यावेळी कारगील दिनानिमीत्त माजी सैनिकाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एन.आर. जेवे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक नानासाहेब व्हरकटे , दत्ता रोहीदास,विजयकुमार लाड.उपस्थीत होते.यावेळी युथ फाउंडेशनचे अभिषेक अंकुशे,जकी पटेल,आलीम बागवान,शहाबाज मुलानी,अभिजित सराफ,गणेश कोळपे,प्रदीप देशमुख व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.