लोहारा/प्रतिनिधी-आई वडिलांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी मुलांनी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन लोहारा न्यायधीश श्रीमती जे.आर.राऊत यांनी केले. लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन करुन कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख म्हणुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विरभद्रेश्वर स्वामी, कार्यालयीन अधिक्षक हंगरगेकर, बार काॅन्सील चे अध्यक्ष अँड.के.डी. मोरे, अॅड.बी.के.भुजबळ,अँड.डी.एस.जानकर, अॅड.जाधव, अदि उपस्थित होते. यावेळी श्रीमती न्यायधीश राऊत पुढे बोलताना म्हणाल्या कि, विद्यार्थींनी आई वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांची शिदोरी शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःजवळ बाळगली पाहिजे, त्यामुळे समाजात गुन्हेगारी वाढणार नाही व परिणाम स्वरुपी न्यायव्यस्थेवर ताण न पडल्याने न्याय व्यवस्था प्रभावीपणे काम करु शकेल असे सांगीतले. यावेळी मान्यवरांनी  व्यसनमुक्ती व कायदेविषयक जाणीव करून भारतीय संविधानातील मुलभुत अधिकार व कर्तव्या विषयी विद्यार्थींना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील प्रा. राजाराम निकम, प्रा.डाॅ. प्रविण जगताप, प्रा.व्यकंट  चिकटे, प्रा.अशोक भोसले, प्रा.विनोद तुंगे, प्रा. राजपाल वाघमारे, प्रा.देविदास चव्हाण, प्रा.डाॅ. शितल गायकवाड, प्रा.स्वाती निकम, प्रा.उमा हलकुडे, प्रा.स्नेहलता करदुरे, प्रा.कलशेट्टी  मॅडम, प्रा.पवार मॅडम, प्रा.कदम मॅडम, यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहातोंडे यांनी केले तर आभार प्रा.मंगेश चेंडके यांनी मानले.
 
Top