तालुक्यातील पानवाडी या छोटेश्या खेड्यातील चि.ओमराजे सोमनाथ डोंगरे हा विद्यार्थी परभणी जिल्ह्यातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय माळीवाडा,ता पाथरी या शाळेत इयत्ता 6 वी वर्गात शिकत असून तो विठ्ठल पब्लिकेशन पुणे आयोजित "मिशन MPSC परीक्षा 2019" या स्पर्धा परीक्षेत 200 पैकी 188 गुण घेऊन राज्यात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
त्याच्या या यशाबद्दल परभणी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण व आरोग्य सभापती सौ.भावनाताई अनिलराव नखाते व माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे,नगरसेवक गोविंद हारकळ* यांनी ओमराजे चे व पालकांचे खूप खूप अभिनंदन केले, शिवाय शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष चिंचाणे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी वांगीकर,उपाध्यक्षा सौ मीरा चंद्रकांत नाईक,सर्व समिती सदस्य* व शाळेच्या वतीने यशस्वी विध्यार्थ्यांसह पालकांचा मोठा सत्कार केला.
लवकरच विठ्ठल पब्लिकेशन पुणे यांच्या वतीने चि.ओमराजे डोंगरे या गुणवंत विद्यार्थ्याचा व पालकांचा मोठा सत्कार करण्यात येणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पानवाडी सारख्या छोट्या गावातील या विद्यार्थ्याने परभणी येथील आंतरराष्ट्रीय माळीवाडा शाळेत* शिक्षण घेत आपल्या गावाचे नावलौकिक वाढवल्यामुळे पानवाडीसह उस्मानाबाद तालुक्यात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
