राजा वैद्य /प्रतिनिधी-
गेल्या कांही वर्षांपासून जिल्हयात पावसाचे प्रमाण कमी झाले असून दुष्काळाचे प्रमाण रौद्ररूप धारण करीत आहे. दरवर्षी सरासरीच्या ७५ ते ८० टक्के पाऊस पडत आहे. तर दोन ते तीन वर्षात नंतर एखाद्या वर्षी सरासरी ओलांडून पाऊस होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हयात वाढत चाललेला पाण्याचा उपसा, ३० हजार हेक्टरच्या पुढे वाढत असलेले ऊस क्षेत्र त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील भु-जल पातळीत साडेतीन मीटर ने घट झाली आहे. विशेषत: भूम, वाशी, या दोन तालुक्यात प्रामुख्याने दिसून येत आहे.
भू-जल सव्र्हेक्षण विभागाने उस्मानाबाद जिल्हयातील ११४ विहिरीचे निरीक्षण केले आहे.  भू-जल स्तरामध्ये वाढ झाली का ? घट झाली. याचा सव्र्हे केला आहे. जिल्हयात गेल्या पाच वर्षापुर्वी सरासरी ११.२० मीटर भू-जल पातळी होती. तर मे २०१९ मध्ये हीच भु-जल पातळी सरासरी १२.७८ मीटर गेल्याचे दिसून आले. गेल्या पाच वर्षातील उस्मानाबाद तालुक्यातील भू-जल स्तर १०.८२ मीटर वर होता. मे २०१९ मध्ये उस्मानाबाद तालुक्यात २४ विहिरीचे सव्र्हे केला असता तालुक्यातील भु-जल पातळी १२.४७ मीटर झाल्याचे दिसून आले. यामध्ये गेल्या पाच वर्षांपेक्षा या वर्षी १.६५ मिटर ने भु-जल पातळी खाली गेल्याचे दिसून आले.
गेल्या पाच वर्षांत तुळजापूर तालुक्यात १०.८८ मीटर भू-जल पातळी खालावली होती. मे २०१९ मध्ये  तुळजापूर तालुक्यात २६ विहीरीचे निरीक्षण केले असता तालुक्यात ११.७७ मीटर भु-जल पातळी खाली गेल्याचे दिसून आले. ०.८९ मीटर ने तालुक्यातल्या भु-जल पातळीत घट झाल्याचे दिसून आले. गेल्या पाच वर्षात उमरगा तालुक्यात १०.६१ मीटर ने भू-जल पातळी खालावली होती. मे २०१९ मध्ये उमरगा तालुक्यातील १७ विहीरचे निरीक्षण केले असता. यामध्ये ११.३८ मीटर ने भुजलस्तर खालावल्याचे दिसून आले. या तालुक्यात ०.७७ मीटर ने जलस्तर खालावला आहे. लोहारा तालुक्यात गेल्या पाच वर्षांत ९.९६ मीटर ने जलस्तर खालावला आहे. मे २०१९ मे ४ विहीरीचे निरीक्षण केले असता भुजलपातळीमध्ये १०.४९ मीटर जलस्तर खालावल्याचे दिसून आले. यावर्षी ०.५३ मीटर ने भूजलपातळीत घट झाली आहे. कळंब तालुक्यात गेल्या पाच वषाँंत ९.८३ मीटर ने भु-जल पातळीत घट आहे. तर मे २०१९ मध्ये १४ विहीरींचे निरीक्षण केल्या नंतर ११.६४ मीटर ने भु-जल पातळी घटल्याचे दिसून आले.यामध्ये १.८१ मीटर भु-जल पातळीत घट झाल्याचे दिसून आले.  भूम तालुक्यात गेल्या पाच वर्षांत भु-जल पातळीत १२.५३ मीटरने खालावली होती. मे २०१९ मध्ये ७ विहिरींचे निरीक्षण केले असता भूजल पातळी १५.९८ मीटरवर गेल्याचे दिसून आले. यावर्षी ३.४५ मीटर ने सगळ्यात जास्त भु-जलस्तर भूम तालुक्यात खालावल्याचे दिसून आले आहे. वाशी तालुक्यात मागच्या पाच वर्षांत भु-जलस्तर १२.५५ मीटर ने खालावला आहे. मे २०१९ मध्ये ७ विहिरींचे निरीक्षण केले असता हा स्तर १५.१३ मीटर ने खालावल्याचे दिसून आले. यावर्षी २.९८ मीटर ने भू-जल पातळीत घट झाल्याचे दिसून येते. परंडा तालुक्यात गेल्या पाच वर्षांत १२.३८ मीटर ने भु-जलस्तर खालावला आहे. मे २०१९ मध्ये १५ विहिरींचे निरीक्षण केले असता. या तालुक्यात १३.४१ मीटरवर भू-जलस्तर गेल्याचे दिसून आले. या तालुक्यात यावर्षी १.०३ मीटर ने भू-जल पातळीत घट झाल्याचे दिसून आले.
भू-जल पातळीत वारंवार घट होऊन देखील ठिंबक सिंचन, स्प्रिंकलर यासाठी प्रशासन व शासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. भू-जल पातळीत घट होत असताना देखील पावसाळ्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याकडे ही शासन व प्रशासन लक्ष्य देत नसल्यामुळे जिल्हयातील भू-जल पातळीत झपाट्याने घट होत आहे. 
 
Top