प्रतिनिधी/ लोहारा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन.डी. ए. सरकारने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवीत सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करुन देशाच्या पंतप्रधान पदी ना. नरेंद्र मोदी यांची सलग निवड झाल्याबद्दल व त्यांनी व इतर मंत्र्यांनी शपथग्रहण सोहळ्यात शपथ घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व तालुक्यातील अचलेर, भोसगा, दस्तापुर, अदि गावात फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करीत, पेढे वाटून, गगनभेदी घोषणा देऊन जल्लोष साजरा करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची सुमारे वीस मिनिटे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय मतदार बांधवांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारत माता की जय, अश्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस सुरेश गुंडेराव वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक राजेंद्र पाटील (अचलेर), बालासिंह बायस, भिम पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, भाजयुमो जिल्हा चिटणीस नेताजी शिंदे, प्रशांत काळे, भाजप मिडिया  तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, माजी  तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, ग्रा.पं. सदस्य संपत देवकर (मार्डी), भाजयुमो माजी तालुकाध्यक्ष प्रवीण चव्हाण, परमेश्वर माशाळकर, पं. स. सदस्य ज्ञानेश्वर परसे, पं.स.सदस्य वामन डावरे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, सुमीत झिंगाडे, कल्याण ढगे, मल्लिनाथ फावडे, बालाजी चव्हाण, कान्हा वाघ, गोपाळ सातपुते, किसन सातपुते, नाना वाघ, शिवसेनेचे अभिमान खराडे, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, प्रकाश चव्हाण, सिद्धेश्वर कुंभार, अमोल पुजारी, प्रविण पुजारी, दिलीप पुजारी, गुलजारसिंग बायस, संतोष पाटील, व्यंकटसिंग बायस, भिम गायकवाड, तात्या पाटील, संदीप मलकुंडे, योगीराज रामशेट्टी, आनंदसिंग बायस, सुनिल पुजारी, विजयकुमार आष्टगे, महेश पाटील, यांच्यासह भाजपा, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top