येथील तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक संकल्पक शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी सांळुखे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.अज्ञानाचा अंधकार दुर करण्यासाठी महाराष्ट्राच्या खेडोपाडी ज्या ज्ञानमहर्षी ज्ञान तपस्वी बापूजी साळुंखे यांनी ज्ञानगंगा प्रवाहीत केली अशा महान तपस्वी व्यक्तिमत्वाचे शैक्षणिक कार्य हे आकाशात तळपत्या सुर्या सारखेच आहे.या प्रसंगी महाविद्यालयाचे वरीष्ठ लिपीक सुमेर कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.प्रा.आशपाक आतार यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी सांळुखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तर विवेकानंद पुतळ्याचे डॉ.शिवाजीराव देशमुख यांनी पुजन केले.या प्रसंगी गोवर्धन भोंडे ,प्रा.क्षीरसागर ,प्रा.सविता कदम ,प्रा.विवेकानंद चव्हाण ,ग्रंथपाल दिपक निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.मणेर यांचे मार्गदर्शन लाभले.
