प्रतिनिधी/उस्मानाबाद-
रा’या‘या मंत्रीमंडळाचा विस्तार रविवार दि.16 जून रोजी होत असून या मंत्रीमंडळात उस्मानाबाद जिल्हयाला प्रतिनिधीत्व मिळणार का ? याकडे उस्मानाबादकरांचे लक्ष लागले आहे.
कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार ‘या कार्यकाळात उस्मानाबाद जिल्हयातील डॉ. पद्मसिंह पाटील, कांॅंग्रेसचे मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील यांचा महाराष्ट्रा‘या मंत्रीमंडळात समावेश असायचा. जिल्हयातील लोकप्रतिनिधींचा मंत्रीमंडळात समावेश असल्यामुळे जिल्हयातील विकास कामां‘या बैठकीत पुरेसा वेळ देत असत. जिल्हयातील लोकप्रतिनिधी असल्यामुळे जिल्हयाविषयी परिपुर्ण माहिती असल्याने जिल्हा प्रशासनावर त्यांचा वचक असायचा.विश्ेाष म्हणजे रा’यातील एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद व विद्युत महामंडळाचे सदस्य पद उस्मानाबाद जिल्हयाला आघाडी सरकार‘या कार्यकाळात मिळाले होते. त्याचप्रमाणे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, गोदावरी खोरे विकास महामंडळ यावरपण काम करण्याची संधी उस्मानाबाद जिल्हयातील लोकप्रतिनिंधींना मिळाली आहे.
 भाजपा-सेने‘या युती‘या कार्यकाळात उस्मानाबाद जिल्हयावर बाहेर‘या जिल्हयाचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री म्हणून लादले गेले. त्यामुळे पालकमंत्री जिल्हा विकास कामा‘या बैठकीत पुरेसा वेळ देत नसल्याचे गेल्या साडेचार वर्षात दिसून आले. शिवसेनेचे दिपक सावंत, दिवाकर रावते घाईगडबडीने डिपीडीसीची बैठक असो, किंवा अन्य विकास कामासंदर्भातील बैठका असोत या बैठका फक्त उरकल्याचेच दिसून आले. जिल्हयात पडलेल्या दुष्काळाची पहाणी मौजुदा पालकमंत्री अर्जुन खोतकर सह दिपक सांवत व रावतेंनी चारचाकी गाड्या‘या प्रकाश केल्याचा इतिहास आहे.
त्यामुळे रा’या‘या विस्तारीत मंत्रीमंडळात उस्मानाबाद जिल्हयातील भाजपाचे विधान परिषदचे सदस्य सुजितसिंह ठाकूर असो अथवा शिवसेनाचे विधानसभा सदस्य ज्ञानराज चौगुले, शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत असोत यापैकी कोणचा मंत्रीमंडळात समावेश होणार का ? याकडे उस्मानाबादकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
 
Top