लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरासह तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त हिंदू - मुस्लिम बांधवांनी एकमेकाला भेटून शुभेच्छा दिल्या. लोहारा शहरातील इदगाह मैदानावर नमाज पठण करुन मुस्लीम बांधवानी रमजान ईद उत्साहात साजरी केली. यावेळी फजल कादरी सय्यदसाब आब्दुल फताह कादरी यांच्या नेतुत्वाखाली ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवानी ईदुल फितरची नमाज अदा केली.
यावेळी आबुलहसन कादरी कादरी यांनी रमजान ईदचे महत्व सांगीतले. इदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यानंतर रमजान ईदनिमित्त हिंदु बांधवांनी मुस्लीम बांधवाना शुभेच्छा देवुन मुस्लीम बांधवांच्या घरी शिरखुर्मा व गुलगुल्याचा आस्वाद घेतला.