लोहारा/प्रतिनिधी-
 लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान व खरीप हंगामी शेती शाळा सोयाबीन पिकावर घेण्यात आली.  या कार्यक्रमास  शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला.
यावेळी प्रमुख म्हणुन तालुका कृषी अधिकारी एम. बी. बिडबाग, वरिष्ठ शास्त्रज्ञ सचिन सूर्यवंशी, कृषी सहाय्यक व्ही.एस.काळे, जे.के.जाधव, शैलेश जट्टे, जे.के. गोसावी, गणेश बिराजदार, सचिन पवार, आत्मा चे कैलास पवार, अदि उपस्थित होते.
यावेळी सोयाबीन पीक शेतीशाळा, माती परिक्षण प्रात्यक्षिक , बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक, बिजप्रकिया प्रात्यक्षिक, पाण्याचे महत्व व संवरक्षित सिंचनाचा वापर, ऊस क्षेत्र कमी करून हळद, अद्रक असे नगदी पिके घ्यावेत आणि फळबाग क्षेत्र वाढ याबाबत सविस्तर मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी एम. बी. बिडबाग यांनी केले. तसेच कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्व उपस्थितांना देण्यात अली. व सदरील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यांनी केले. रुंद सरी व वरंबा पेरणी पद्धतीचे महत्व आणि प्रक्षेत्रावर जाऊन प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ सचिन सूर्यवंशी यांनी केले. सदरील कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राचे समनव्यक सचिन सूर्यवंशी, कृपीसहाय्यक व्ही.एस. काळे, जे.के. जाधव, शैलेश जट्टे, जे.के. गोसावी, गणेश बिराजदार, सचिन पवार, वआत्मा चे कैलास पवार यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top