इर्ला /प्रतिनिधी-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती, उस्मानाबाद यांच्या वतीने भव्य मोफत रोगनिदान व औषधी वाटप शिबीर इर्ला येथे घेण्यात आले. शिबीराचे उद्घाटन आ. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
सततच्या दुष्काळामूळे होणा-या आत्महत्या व दुष्काळाचा होणारा आरोग्यावरील वाईट परिणाम त्यामूळे ग्रामीण भागातील जनता असंख्य व्याधी घेवून जगत असतात. त्यातून पुढे मोठे दुर्धर आजार उद्भवतात. त्याला आळा घालण्यासाठी शहरातील नामवंत डॉक्टरांच्या माध्यमातून समितीने हे शिबीर घेतले. या शिबिराच्या माध्यमातून 350 रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात स्त्री रोग, बालरोग, अस्थिरोग, मानसोपचार तज्ज्ञ, जनरल फिजिशीयन, नेत्ररोग इ. तज्ञ डॉक्टर शिबिरात होते.
शिबीराची सुरुवात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या मुर्तीचे पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कुसुम चौरे अध्यक्ष स्थानी होत्या तर लक्ष्मण सरडे, राजाभाऊ शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गोविंद कोकाटे, डॉ. संजय सोनटक्के, डॉ. संतोष पाटील, डॉ. राहुल जेडगे, डॉ. दयानंद चौरे, डॉ. चंद्रशेखर मुंडकर, डॉ. क्षितिज गाढवे, डॉ. रवींद्र पापडे, डॉ. रेखा टिके, डॉ. अवंती बोडखे, डॉ. धनश्री झाडबुके, डॉ. प्रियांका नायगावकर, डॉ. प्रतिक्षा भरकड, डॉ. आशिष सिंह ह्या डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने प्रा मनोज डोलारे, प्रा. सोमनाथ लांडगे, प्रा. शत्रुघ्न सुरवसे, विष्णू चौरे, बजरंग पाटील, अतिक वाघमारे, ईश्वर गीरी, हारुण पटेल, अभिजित चौरे, आरीफ शेख आदींनी परिश्रम घेतले. या शिबीरासाठी ग्रामस्थ व परिसरातील गरजू मोठ?ा संख्येने उपस्थित होते.