उस्मानाबद/प्रतिनिधी-
वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, उस्मानाबाद यांच्या वतीने उस्मानाबाद शहरातील  वीरशैव जंगम मठ व माऊली चौक येथे क्रांतिसूर्य लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर 888वी जयंती  निमित्त आज सकाळी 11 वाजता प्रतिमेचेपुजन  जयंती चे अध्यक्ष तथा राष्टीय चर्मकार महासंघाचे युवक प्रदेश अध्यक्ष नितीन (बप्पा) शेरखाने , बहुजन योद्धा  संघटनेचे संस्थापकअध्यक्ष धनंजय(नाना) शिंगाडे ,  बसवेश्वर पतसंस्थाचे अध्यक्ष श्रीकांत साखरे ,युवक नेते सर्वश्री अक्षय ढोबळे,   राजसिंह राजे निंबाळकर ,अभिराम पाटील  तुषार निंबाळकर,  ऍड विश्वजित शिंदे, अग्निवेश शिंदे,डॉ. आदिनाथ राजगुरू डॉ. अनंत राजमाने,ऍड गणपती कांबळे, अभिजित गिरी, लक्षमण माने,पप्पू मुंडे, ऍड माढेकर,उमाकांत आंग्रे, सतीश लोंढे, संजोग पवार, साहेबराव शेरखाने, राहुल कोरे, दत्ताभाऊ चव्हाण , आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले .  या वेळी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या व राचलिंग महाराज यांच्या संजीवन समाधी चे पूजन सर्व मान्यवरांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरशैव जंगम मठ ट्रस्ट चे अध्यक्ष तथा लिंगायत संघर्ष समितीचे मराठवाडा उपाध्यक्ष शिवानंद कथले यांनी केले. सूत्र संचलन चर्मकार महासंघाचे सचिव बबनराव वाघमारे सर यांनी केले . या वेळी धनंजय शिंगाडे,डॉ. अनंत राजमाने , अक्षय ढोबळे ,ऍड विश्वजित शिंदे अग्निवेश शिंदे,नितीन शेरखाने आदी मान्यवरांनी महात्मा बसवेश्वर यांचे सामाजिक धार्मिक आद्यत्मिक कार्य सांगून सर्व बसव प्रेमींना शुभेछ्या दिल्या. सर्व मान्यवरांनी ट्रस्टचे अध्यक्ष शिवानंद कथले, व कोषाध्यक्ष वैजीनाथ गुळवे यांचा सत्कार केला .या वेळी अनिल जवळे,  दिलीप गुळवे, परमेश्वर वाले ,गार्डे,सुनील पंगुडवाले, गणेश इंगळगी,   बसवेश्वर शेटे, प्रशांत बेदरे,  अड मुदकना ,अड अजय वाघाले,  वीरभद्र तोडकरी, ,आदिं समाज बांधव सह बसवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या वेळी सर्व उपस्थितांना  महात्मा बसवेश्वर यांचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष व जयंती अध्यक्ष नितीन शेरखाने यांनी  आपले अध्यक्षीय विचार व्यक्त केले .आभार प्रदर्शन वैजीनाथ गुळवे यांनी मानले.
 
Top