परंडा /प्रतिनिधी : -
परंडा -करमाळा रोडवर डोमगाव फाटा येथे तानाजी भिम सरवदे रा.सुंदरवाडी ता.उमरगा याने त्याचे ताब्यातील ट्रक अतिवेगाने हयगयीने व निष्काळजी पणे चालऊन करमाळा आगाराची एस .टी.बस क्र.एम.एच. १४ बी.टी. ०९३२ ला पाठीमागील बाजुस जोराची धडक देवून अंदाजे ३०ते३५ हजार रुपयांचे नुकसान करण्यास कारणीभुत झाला आहे.
          या आपघातात सुदैवाने बस मधील प्रवाशी सुखरूप आहेत.परंतु बसचे मागील बाजूचे नुकसान झाल्यामुळे नितीन आगतराव जाधव (बस चालक) बस आगार करमाळा यांच्या फिर्याद वरून तानाजी भिम सरवदे याच्या विरुध्द  परंडा पोलिसात   भादंविचे कलम 279,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Top