तुळजापूर / प्रतिनिधी:--
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ,कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे इंटरनल क्वालिटी इन्शुरन्स  सेल या विभागातर्फे बौध्दीक संपदा अधिकार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रसिध्द कायदेतज्ञ अॕड दत्ताञय घोडके यांनी वरील प्रतिपादन केले.आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात ते पुढे म्हणाले की,आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर जेंव्हा नवनिर्मिती करत असतो तेंव्हा ती निर्मिती आपली संपत्तीच असते.परंतु या नवनिर्मितीला कायद्याने सुरक्षीत करणे आवश्यक आहे. उदा. संशोधनात्मक ग्रंथ निर्मिती ,मशीन ,लोगो या सर्व बाबी नव निर्मिती झाल्यावर दुसरा व्यक्ती या संशोधनाचे कॉपी पेस्ट करु नए यासाठी पेंटटच्या स्वरुपात या संशोधनास कायद्याने सुरक्षीत करणे गरजेचे आहे. व्यावसायिक कार्यामध्ये एका कंपनीचा लोगो दुसरी कंपनी वापरु शकत नाही.किंवा सिनेमातील एखादे गाणेसुध्दा कॉपी पेस्ट कायद्याने करता येत नाही.त्यामुळे याबाबत समाजात जागृती होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर म्हणाले की, ट्रेडमार्कची कॉपी करणाऱ्या कंपन्यावर आळा बसणे गरजेचे आहे.भारतातील बरेचसे उत्पादनावर बाहेरुन अधिकार आलेले आहेत.थोडा बदल होऊन आलेली बाजारातील वस्तु मुळ वस्तुची गुणवत्ता देऊ शकत नाही.शेवटी विद्यार्थ्यांनी कायद्याच्या क्षेञात आपले करिअर करण्याचा सल्लाही त्यांनी दीला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता विकास समिती प्रमुख प्रा.डॉ .मेजर वाय.ए.डोके यांनी केले तर सूञसंचलन प्रा.विवेकानंद चव्हाण यांनी केले. याप्रसंगी प्रा.डॉ .शिवाजीराव देशमुख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ऊपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा.आशपाक आतार यांनी मानले.
 
Top