प्रतिनिधी/उस्मानाबाद-मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेशा‘या अवमान प्रकरणी प्रकाश सदाशिव माळी यांना एक आठवडयाची कैद व रूपये दोन हजार दंडाची शिक्षा ठोठवली. श्रीमती प्रेमकलाबाई वसंत माळी यांनी उस्मानाबाद येथ्ील स्थावर व जंगम मालमत्तेचा वाटणीसाठी उस्मानाबाद न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. सदरचा दावा दि.23 एप्रील 2010 रोजी डिक्री होवून वाटणी आधारे स्थावर मिळकतीमध्ये अर्धा हिस्सा देण्याचा आदेश केला. त्याविरूध्द प्रेमकलाबाई यांचे दिर प्रकाश माळी यांनी जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले. सदर अपिल जिल्हा न्यायालयने फेटाळून लावले. त्यानंतर प्रकाश माळी यांनी मा. उ"ा न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे दुसरे अपिल दाखल केले. वादातील मिळकत ही उस्मानाबाद शहरातील सव्र्हे नं. 16, 13/9, 722/2, 12 या मिळकती विक्री करून नये किंवा गहाण ठेवु नये व जैसे थे परिस्थिती कायम ठेवावी असा अंतरिम आदेश मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांनी दि. 19 डिसेंबर 2006 रोजी पारीत केला. सदर आदेश सब रजिस्ट्रार उस्मानाबाद यांना अवगत करण्यात आला. न्यायालयाचा वरील प्रमाणे निर्णय असतांना प्रकाश माळी यांनी प्लॉट पाडून वादातील मिळकत अनेक व्यक्तींना विक्री केली व मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यां‘या आदेशाचा भंग करून अवमान केला म्हणून अर्जदार रामेश्वर वसंतराव माळी यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे प्रकाश माळी व इतर प्रतिवादी व तसेच खरेदीदार यांचे विरूध्द अवमान याचिका दाखल केली. प्रतिवादीनी सदर खरेदीखत अनावधनाने करून दिल्याचे मान्य केले. सदर अवमान अर्जदार दि. 2 मे 2011 रोजी सुनावणी झाली. अर्जदाराने सर्व खरेदीख्त दाखल केले व मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यां‘या दि.19 डिसेंबर 2006 व दि.28 फेबु्रवारी 2007 रोजी पारित केलेल्या आदेशाचा हेतुपुरस्पर भंग केला आहे. व सदर वादातील मिळकतीत प्लॉट पाडून अनेक जणांना विक्री करून प्रचंड पैसा कमवला असल्याचे निदर्शनास आणून दिले.
सदर अवमान याचिकेची मा. न्यायमुर्ती श्रीमती विभा कंकनवाडी यां‘या समोर सुनावणी झाली असता मा. न्यायमुर्तींनी दुसरे अपिलातील अपिलकार प्रकाश उर्फ शाम सदाशिव माळी यांनी मा.उ"ा न्ययालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यां‘या आदेशाचा हेतुपुरस्कार भंग केला आहे. व अवमान केला आहे. म्हणुन अवमान याचिका कायद्यातील कलम 12 (1) नुसार प्रकाश माळी यांना 08 दिवसा‘या साध्या कैदेची शिक्षा सुनावणी व रूपये दो हजार रूपयाचा दंड ठोठावला. प्रकाश माळी हे न्यायालयात सुनावणीसाठी हजर होते. तेथेच त्यांना पोलिसां‘या ताब्यात देण्यात आले. त्यांची तेथुनच कारागृहात रवानगी करण्यात आली. सदर प्रकरणात अर्जदार रामेश्वर माळी यां‘यावतीने अॅडव्होकेट व्ही.डी. गुणाले यांनी बाजू मांडली.